संवाद ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. नाटक, संगीत, साहित्य आदी
कलांच्या विकासासाठी व्यापक अशी सांस्कृतिक चळवळ 'संवाद' राबवत आहे. याच
भूमिकेतून महाराष्ट्रातल्या तसेच ग्रामीण भागांमध्ये बालनाट्य शिबिरं, युवा
नाट्य शिबिरं, बालनाट्यांचे प्रयोग असे उपक्रम संस्था सातत्याने राबवीत असते,
मराठी राज्यस्तरीय एकांकी स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, प्रायोगिक नाटकांचे
आयोजन, त्याचप्रमाणे बालचित्रपट महोत्सव, 'आई' सांस्कृतिक महोत्सव, दिवाळी पहाट असे अनेक विविध कार्यक्रम ' संवाद ' आयोजित करत असते. संवादने आजवर अनेक देखणे कार्यक्रम सदर केले आहेत.
|