सुवर्णमयी मराठी नाट्यसंमेलन
 
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
 

सांस्कृतिक क्षेत्रातील मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 
संवाद

'संवाद ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. नाटक, संगीत,  साहित्य आदी
कलांच्या विकासासाठी व्यापक अशी सांस्कृतिक चळवळ 'संवाद' अशी राबवत आहे. याच
भूमिकेतून महाराष्ट्रातल्या तसेच ग्रामीण भागांमध्ये बालनाट्य शिबिरं, युवा
नाट्य शिबिरं, बालनाट्यांचे प्रयोग असे उपक्रम संस्था सातत्याने राबवीत असते,
मराठी राज्यस्तरीय एकांकी स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, प्रायोगिक नाटकांचे
आयोजन, त्याचप्रमाणे बालचित्रपट महोत्सव, 'आई' सांस्कृतिक  महोत्सव, दिवाळी
पहाट असे अनेक विविध कार्यक्रम ' संवाद ' आयोजित करत असते. संवादने आजवर अनेक
देखणे कार्यक्रम सदर केले आहेत. 'प्रभात' चे राम गबाले यांच्या जीवनकार्यावर
आधारित 'रामकथा' जेष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनकार्यावर  आधारित '
मी पणशीकर बोलतोय' , कोथरूड उपनगरीय नाट्य संमेलन, हे त्यापैकी काही उल्लेखनीय
कार्यक्रम. त्याचप्रमणे कवियत्री बहिणाबाई चौधरी, शांता शेळके , इंदिरा संत,
कवी ना. धो. महानोर, सुरेश भट, गायक - संगीतकार हृदयनाथ  मंगेशकर अशा
मान्यवरांच्या जीवनावर कार्यक्रम सादर केले आहेत.

'संवाद'  ने महाराष्ट्रात प्रथमच  महाराष्ट्रातील एकपात्री कलाकारांना एकत्र
आणून एकपात्री कलाकारांच पहिलं संमेलन आयोजित केलं, तसेच 'एकपात्रींची यात्रा'
ही पुस्तिका प्रकाशित केली. तसेच विविध छंद जोपासणाऱ्या छांदिष्ट मंडळींचं
पहिलं संमेलनही ' संवाद' ने च आयोजित केलं व त्या अनुषंगाने 'छंदनगरी'  ही
पुस्तिका प्रकाशित केली, तसेच या छंदाच भव्य प्रदर्शन पण भरवलं. 'संवाद' ने
पुण्यात प्रथमच लावणी व तमाशा महोत्सवाचं आयोजन केलं. महाराष्ट्रात साहित्य
संमेलनाप्रमाणेच  नाट्य संमेलनाची परंपरा घडली आहे. 'संवाद; हे नाट्य
संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणाचे संग्रह असलेली 'नाट्य पंढरीचे सन्मानित' ही
पुस्तिका प्रकाशित करून एक प्रकारचे परंपराचे डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न
केला. विविध कलावंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेला देखणा दिवाळी अंकही 'संवाद'
ने प्रकाशित केला. त्याचप्रमाणे गोपीनाथ तळवलकरांचे 'संस्कृती' हे  लहान
मुलांच्या साहित्यावरील पुस्तक प्रकाशित केलं. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम
लागू यांच्या लमाण या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्याच सौभाग्य '
संवाद' ला लाभल.

 
घुंगरू
संवाद
 
नुकत्याच झालेल्या घडामोडी
     
छायाचित्र विभाग
संवाद सामाजिक जुन्या आठवणी बालमहोस्तव सांस्कृतिक मान्यवर