|
कार्यक्रम
|
|
- शिक्षकांसाठी साहित्य म्हणजे काय ? भाषा विषय मुलांना कसा शिकवावा आशा विषयांवर परिसंवाद.
- माझी हस्ताक्षर चळवळ ह्या मधुकर वडके ह्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन.
- मुलांसाठी बालनगरी विविध मुलांसाठी शैक्षणिक प्रदर्शन यात ४० स्टॉलचा सहभाग.
- फुलराणीला तिसरा डबा बसवावा म्हणून १०० मुलांचे आंदोलन, महानगरपालिकेतर्फे फुलराणीला तिसरा डबा जोडण्यात आला.
- पेशवेपार्क मधील बोटीतून पाणी येत असल्याबद्दल आंदोलन महानगरपालिकेतर्फे बोट बदलण्यात आली.
- रस्त्यांच्या खड्ड्याबद्दल आंदोलन.
- मुलांच्या वाहतुकीबद्दल परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्र यांचे आंदोलन.
- भूकंपग्रस्तांसाठी निधी संकलन, ' दैनिक सकाळ रिलीफ फंडास' आर्थिक मदत.
- विविध कार्यक्रमात पुष्पगुच्छ, हार न वाटत विविध रोपे पाहुण्यांना देऊन त्यांचे स्वागत व वृक्षारोपण.
- आगस्ट क्रांतीदिनानिमित्त ' मी भ्रष्टाचार करणार नाही ' दहा हजार मुलामुलींची प्रतिज्ञा. स्वातंत्र्य सैनिकांशी गप्पागोष्टी व मिरवणुका यांचे संयोजन.
- गणेशोत्सवात गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय.
- किल्ले स्पर्धा व लालमहालात शिवराज्यभिषेकाचे आयोजन.
- पर्यावरण दिन साजरा.
- नागपंचमीद्वारे निमित्त सर्प यात्रेचे आयोजन.
- प्रत्यक्ष गजराज (हत्ती) सोबत मुलींचा भोंडला.
- पडद्यामागील कलाकारांना आर्थिक मदत.
- ब. बापू पुरस्काराचे संयोजन.
- आगाखान पॅलेस जवळ असणाऱ्या बुलककार या बिअर बार बद्दल आंदोलन, मुख्यमंत्री यांना निवेदन.
- वृद्ध कलावंतांना वेळच्यावेळी मानधन मिळावे याबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदन.
- मुलांना विमानाची माहिती व्हावी याकरिता विमाने व विमानतळांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन.
- महाराष्ट्रातील विविध लोककलांपैकी तमाशा ह्या कलेचा बालगंधर्व रंगमंदिरात महोत्सव व कलावंतांचा सत्कार.
- जगप्रसिद्ध भारतीय कथ्थक सम्राट कै. गोपीकृष्णन यांचा सत्कार.
- प्रायोगिक कलावंताना रंगमंच उपलब्ध व्हावे म्हणून बालगंधर्व रंग्मान्दिरामधील कलादालन महानगरपालीकेपार्फे देण्यासाठी संस्थेने मागणी केली टी मान्य करून विविध प्रायोगिक संस्थांना कलादालन खुले.
- रंगमंदिर मुलांच्या कार्यक्रमासाठी शनिवार, रविवार, गुरुवार व सुट्ट्यांच्या दिवशी मिळावे म्हणून महानगरपालिकेकडे मागणी केली व टी मंजूर करण्यात आली.
|
 |
|
|