|
कार्यक्रम
|
|
- कथाकथन, चर्चासत्र, परिसंवाद विविध कार्यक्रमांचे आयोजन.
- आकाशवाणी, दूरदर्शन ह्या माध्यमांसाठी मुलांना मार्गदर्शन वर्ग.
- 'एक होता बिरबल' या व्हीडीओ चित्रपटांची निर्मिती.
- '२४ मार्च १९८७' ला कै. दिनानाथ मंगेशकर विद्यालयाची स्थापना.
- मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नृत्य, संगीत, तबला, पेटी यांचे वर्ग.
- रिमांड होम, अंध शाळा, अपंग शाळा तसेच ह्या संस्थांसाठी विनामूल्य कार्यक्रमांचे आयोजन.
- मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून उद्यानात मुलांसाठी पुस्तक मेळावा.
- मुलांच्या विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचे संस्थेतर्फे संस्कार.
- एक व्यावसायिक, दोन लोकनाट्य, जगदीश खेबूडकर यांची लावणी मैफिल, 30 मराठी एकांकिंका व ७० बालनाट्ये यांची संस्थेतर्फे निर्मिती.
- बालगंधर्व रंगमंदिरात रौप्य महोत्सव वाढदिवस साजरा.
- पुण्यातच प्रथमच विविध छंद असणार्या प्रकारचे चांद जोपासणार्या, व्यक्तींच्या साहित्याचे प्रदर्शन व संमेलन.
- नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे संयोजन.
- महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे, सामाजिक कार्यक्रमातून नाट्यसमीक्षा करणारे नाट्य समीक्षक यांचा मेळावा. महाराष्ट्रातील ५० नाट्य समीक्षकांचा सहभाग.
- बालगंधर्व रंगमंदिरात सतत ८ वर्ष राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धांचे आयोजन.
- पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यात कडूस ह्या ग्रामीण भागात बालनाट्य महोत्सव.
- पथनाट्य स्पर्धांचे आयोजन ' मुलगी झाली हो' ह्या स्त्री मुक्ती पाथनाट्याचे शनिवार वाड्यावर प्रयोग.
- मराठी रंगभूमी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवनिमित्त गोखले कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा सत्कार, नाट्य, संमेलन, अध्यक्षांचे सत्कार, नाट्यपंढरीचे सन्मानित ह्या स्मरणिकेचे प्रकाशन.
- कै. राम नगरकर यांच्या रामनगरी एकपात्री ५०० व्या प्रयोगाचे आयोजन.
- पुण्यात विविध भाषेतील विविध बालचित्रपटाचे आयोजन.
- पुण्यातील पुणे फेस्टिव्हल शोभायात्रा, तिकीट विक्री चे संयोजन.
- सिनेतारका ' हेमा मालिनी' यांच्या 'दुर्गाबले' ह्या कार्यक्रमाचे संयोजन.
- पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार्या बालगंधर्व पुरस्काराचे संयोजन.
- ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार व छोटा गंधर्व यांच्या गप्पांच्या कार्यक्रमाचे संयोजन.
- कृष्णदेव मुळगुंद यांच्या 'नाचतो मी नाचतो' या आत्मचरित्राचे प्रकाशन समारंभ आयोजन .
|
 |
|
|